विमा कंपनी विरोधातला दावा कोर्टाने फेटाळला

0

जळगाव । प्रवाश्यांना घेऊन जात असलेली मारोती ओमनी ट्रकला ओव्हरटेक करत असताना अपघात झाल्याने जखमी प्रवाश्यांनी नुकसान भरपाईसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीविरोधात दाखल केलेला दावा न्यायालयाने फेटाळला. ओमनीचा विमा नसल्याने जखमी प्रवाशी नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. 14 एप्रिल 13 रोजी फातिमा बी.शेख नजीर पिंजारी हे त्यांच्या नातेवाईकांसोबत मुक्ताईनगरला जाण्यासाठी भुसावळ येथुन मारोती ओमनी क्रमांक एम.एच. 19 वाय 561 मध्ये बसून निघाले होते. फौजी ढाबा ते भुसावळ वरणगाव दरम्यान ओमनीने जात असताना ट्रक क्रमांक आर.जे. 07 जी.बी. 3815 ला ओव्हरटेक करत असताना अपघात झाला.

युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनीवर दावा
अपघातात फातिमा बी.शेख यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना दुखापत झाली होती. याप्रकरणी फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला ट्रक चालक चंपकलाल जसुराम (बिकानेर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान फातिमा पिंजारी यांनी मोटार अपघात नुकसान दावा क्रमांक 305/ 15 प्रमाणे युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनीवर दाखल केला होता. ट्रक हा या कपंनीकडे विमाकृत होता. दाव्याच्या चौकशीत साक्षीदार, जखमी चालक इत्यादींच्या साक्षी तपासण्यात आल्या. ज्या मारोती ओमनीमधुन प्रवाशी प्रवास करत होते. त्या वाहनाचा अपघात प्रसंगी कोणताही विमा नव्हता, हा मुददा विमा कंपनीचे ड. विजय काबरा यांनी कोर्टाच्या लक्षात आणू दिला.