मुंबई-विमा कंपन्यांच्या गलथान कारभारामुळे 90 लाख शेतकरी या योजनेस अपात्र ठरले आहेत. या योजनेपासून शेतकरी वंचित राहिले आहेत असा आरोप करुन सर्व शेतकर्यांना सरसकटपणे पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळायला हवी, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. ’मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकारची पीक विमा योजना कंपन्यांच्या फायद्यासाठी नव्हे तर शेतकर्यांच्या भल्यासाठी आहे. मात्र,पीक विमा योजनेचा फायदा शेतकर्यांना फायदा होत नाही. सरकारने शेतकर्यांसाठी जे पैसे विमा कंपन्यांकडे दिले आहेत. त्यातून कंपन्यांचा नफा वगळून सर्व पैसे शेतकर्यांना मिळाले पाहिजेत. त्यासाठी या योजनेतील त्रुटी दूर व्हायला हव्यात. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांना एक पत्रही दिले आहे,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने आवाज उठवल्यामुळे 10 लाख शेतकर्यांना आतापर्यंत 960 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. यापुढेही शिवसेना शेतकर्यांना मदत मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.