माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे आंदोलन
जळगाव: केळी पिक विम्याचे निकष राज्य सरकारने बदलले आहे. त्यामुळे राज्यातील विशेषत: जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विम्या कंपन्यांचा फायदा व्हावा यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी विमा कंपन्यांशी हातमिळवणी केली असून मंत्र्यांनी स्वत:चा खिसा गरम करण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. केळी पिक विम्यात मोठा घोटाळा झाल्याचे आरोपही महाजन यांनी केले आहे.
आज सोमवारी २ नोव्हेंबर रोजी आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे आंदोलन झाले, यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. केळी पिक विम्याचे निकष बदलून पूर्वी प्रमाणे करावे अन्यथा ९ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आमदार महाजन यांनी दिला आहे.