लंडन । टेनिस विश्वातील सर्वात मातब्बर खेळाडू म्हणून जिची ओळख आहे ती व्हीनस विल्यम्स आता सर्वात बुजूर्ग टेनिसपटू ठरली आहे. विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी व्हीनस विल्यम्स ही गेल्या 23 वर्षांतील बुजूर्ग टेनिसपटू ठरली आहे. 37 वर्षांच्या व्हीनसन चौथ्या फेरीत अॅना कोन्हूचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सेंटर कोर्टवर ही झुंज पार पडली. दरम्यान, 1994मध्ये मार्टिन नव्हरातिलोव्हा ही विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी बुजूर्ग टेनिसपटू ठरली होती. कोको व्हँडेवेघने आतापर्यंत दुसर्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.