लंडन । जागतिक टेनिसमधील महत्वाची ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्या विम्बल्डन स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत खेळायला मिळावे, जिंकावी असे कुठल्याही टेनिसपटूचे स्वप्न असते. यंदा तर या स्पर्धेचे 140 वे वर्ष आहे.
1 गूगलने विम्बल्डन स्पर्धेसाठी खास डूडल बनवून टेनिसप्रेमींना एक सुखद धक्का दिला आहे.
2 या डूडलमध्ये दोन टेनिस रॅकेट्स खेळताना दिसतात.
3 त्यातील एक रॅकेट ड्रॉप शॉट्सद्वारे गुण मिळवतो असे या डूडलमध्ये पाहायला मिळते. डूडलमध्ये रूफ्स द हॉक दाखवण्यात आले आहे. याचा उपयोग कबुतरे टेनिस कोर्टवर येऊ नयेत म्हणून केला जातो.
गूगलमधील एलला चेअर अम्पायर बनवण्यात आले. ग्रासकोर्टवर खेळली जाणारी ही स्पर्धा टेनिस जगतातील सर्वात जुनी स्पर्धा आहे. 1877मध्ये द ऑल इंग्लंड क्रोक्वेट अॅड लॉन टेनिस क्लबने स्पर्धेचे पहिल्यांदा आयोजन केले होते.