पिंपळनेर । विरखेल ते कोकणगाव तांडा या रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असल्यामुळे दळणवळण पूर्ण ठप्प झाले असून वाहतूक धोक्यात आली आहे. प्रमाणापेक्षा खडी मोठ्या आकाराची वापरल्याने किरकोळ अपघाताच्या घटना रोज घडत आहे.यामुळे नागरिकांनी व वाहनचालकानी ठेकेदाराविरूध्द विरखेल ग्रामपंचायतीने ठराव करून कारवाईची मागणी केली आहे.
अशी आहे रस्तेकामाची सद्यस्थिती..
विरखेल ते कोकणगाव तांबडा या तीन कि.मी अंतराच्या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम खाजगी ठेकेदारास देण्यात आले आहे.विरखेल व धामंदर या गावातील लोकांना पिंपळनेरट व तालुक्यातील इतर गावाकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसापासून जमेल तसे टप्प्याटप्प्याने सुरू करतात.मोठी खडीचा वापर करून त्यावरून डांबर फवारणी केली आहे. रस्त्यासाठी वापलेली खडी उखडून वरती आल्याने रस्ता धोकादायक बनला आहे.रोजच अपघाताच्या घटना घडतात असल्याने रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाद्वारे केली.प्रमाणापेक्षा जाड व मोठ्या आकाराची खडीचा वापर केला असल्याने व व्यवस्थित रोलींग न केल्याने वाहतुकीस मोठी अडचण व गैरसोय बनली आहे. रस्त्यावरची खडी निघून आल्याने मोठे मोठे खड्डे पडले आहेत. कार्पेट करून बारीक खडीचे टाकून रस्ता तयार करण्यास टाळाटाळ करीत आहे.ठेकेदाराची निविदा रद्द करण्याची मागणी सरपंच नामदेव चौधरी, उपसरपंच संजय भदाणे, भटू भदाणे, नानाजी अहिरे, रामचंद्र चौरे,आबा अहिरे, किशोर भदाणे, सुपडू सोनवणे आदींनी केली आहे.