‘विरदी’च्यावतीने 700 विशेष मुलांसाठी खास कार्यक्रम

0

पुणे । मनजितसिंग विरदी फाउंडेशनच्यावतीने अनाथ, मतिमंद, अंध, अपंग, कॅन्सर, एचआयव्ही ग्रस्त, रेड लाइट एरियामधील 700 मुलांनी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा आनंद लुटला. मनजितसिंग विरदी फाउंडेशनच्यावतीने हा चित्रपट दोन मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी विनोद सातव, शैलेश जगताप, श्री व सौ. भिंगारदिवे, नगरसेविका नंदा लोणकर, राजवीरसिंग घई, अरविंद बुधानी, माजी नगरसेवक बाबू वागसकर, चरणजितसिंग सहानी, भोलासिंग अरोरा, अजितसिंग राजपाल, गुरविंदरसिंग राजपाल, डॉ. अबू बुकार शेख, इंदरदीप कौर, सुचेन्द्रा चौधरी, पोलिस अधिकारी वैशाली चांदगुडे, परवेझ जमादार, विद्यालता चव्हाण, अ‍ॅड. वसिम शेख, यासिन शेख व विविध क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आयनॉक्सचे सिद्धार्थ मनोहर व अंकुर कटियाल यांनी मनजितसिंग विरदी यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले .

या चित्रपटाचे आयोजन मनजितसिंग विरदी , मनप्रित विरदी, मनमित विरदी, रिद्दीमा विरदी, हरभजनकौर विरदी, सहेर विरदी, करणसिंग गिल आदींनी विशेष परिश्रम घेतल. यावेळी मुलांना खाऊ आणि गुलाबपुष्प देऊन मनजितसिंग यांनी त्यांचे स्वागत केले. अक्षर पाऊल, महावीर निवासी मतिमंद, सेंट मार्गारेट, संतुलन, झेप, केअर इंडिया, अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, स्वरूपवर्धिनी, सेवाधाम मतिमंद निवासी, एथेल गॉर्डन, महावीर निवासी मूकबधिर, आधार, सिप्ला एज फाउंडेशन, तैय्यबिया अनाथ आश्रम, टीओआय, शिलार व रेड लाईट एरियामधील मुलांनी या चित्रपटाचा आनंद लुटला.