विराटचा आणखी नवा विक्रम; यांचा विक्रम मोडला !

0

पुणे: भारताचा कर्णधार विराट कोहलीने पुण्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली. ही फलंदाजी करताना कोहलीने भारताचे कर्नल अर्थात दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडला.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले होते. पण त्यावेळी कोहली या विक्रमापासून थोडा लांब होता. पण दुसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करत कोहलीने दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कसोटी कारकिर्दीमध्ये वेंगसरकर यांनी आतापर्यंत 6868 धावा केल्या होत्या. कोहलीने मात्र आज दमदार फलंदाजी करत वेंगसरकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.