सिडनी । भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी क्रिकेटर ठरतोय. दक्षिण आफ्रिकेतही विराट कोहलीने सिद्ध केले की परदेशातील खेळपट्ट्यांवरही तो विक्रम बनवू शकतो. स्टीव्हन स्मिथ, केन विल्यमसन्स, ज्यो रुट, एबी डे विलियर्स आणि विराट कोहली हे सध्याच्या घडीचे आघाडीचे फलंदाज आहेत. स्टीव्हन स्मिथ आणि विराट कोहलीचे विचारही अनेकदा जुळतात.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने एका मुलाखतीदरम्यान विराट कोहलीचे तोंडभरुन कौतुक केले. विराटकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. विराट ज्याप्रमाणे फिरकी गोलंदाजीवर शॉट खेळतो ते शॉट पाहून मी अनेकदा त्याची कॉपी करतो. एखाद्या फलंदाजांमध्ये काही वेगळेपण असेल तेव्हाच तो फलंदाज जगात अव्वल ठरतो. विराटमध्ये असेच वेगळेपण आहे जे त्याला खास ठरवते. आयसीसी रँकिंगमध्ये विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर वन, कसोटीत दुसर्या तर टी-20मध्ये तिसर्या स्थानावर आहे. तो सध्या ज्या फॉर्मात त्याचप्रमाणे कामगिरी केली, तर कसोटी आणि टी-20मध्येही तो नंबर वन ठरेल.