नवी दिल्ली । विराटची यांची तुलना ट्रम्पशी करणे मूर्खपणा आहे.विराट कोहलीने जे केले ते स्मिथने देखील केले असावे. मी आणि ऑस्ट्रेलियन चाहते विराटला पंसत करतात.विराट ज्या प्रकारे खेळतो त्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूची झलक दिसते. त्याच्यामध्ये आव्हान स्वीकारण्याची वृत्ती अप्रतिम आहे.त्याला ऑस्ट्रेलियन मीडियाने जबर टार्गेट केले आहे.आमचे दोन -तीन पत्रकार त्याची प्रतिम धुळीस मिळविण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतात.असे मत माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने आपले मत व्यक्त केले आहे.अप्रत्यक्षरित्या विराटला पाठिंबा दिला आहे.
स्मिथदेखील विचलित होत असावा
‘डेली टेलिग्राफ’मधील वृत्तात कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली होती. ऑस्ट्रेलियाचे फिजिओ पॅट्रिक फॉरहर्ट यांच्यावर दडपण आणल्याचा कोहलीवर आरोप लावण्यात आला . क्लार्कने मात्र भारतीय कर्णधाराची बाजू घेतली. तो म्हणाला, विराटला मात्र त्रस्त होण्याची गरज नाही.” क्लार्क म्हणाला, “ऑस्ट्रेलियन मीडियात जे प्रकाशित होत आहे ते वाचून स्मिथदेखील विचलित होत असावा. अशा स्थितीत दोन्ही कर्णधारांनी धरमशाला येथे विजय कसा मिळेल, याबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. सध्याच्या मालिकेत 2015 च्या अॅशेस मालिकेसारखी परिस्थिती उद्भवली आहे. त्या वेळी प्रत्येक सामना जीवनमरणाचा प्रश्न बनल्यामुळे विजयासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावले होते. मैदानाबाहेर मात्र उभय संघांत मैत्रीभाव कायम होता.
चॅम्पियन खेळाडूंचे लक्ष
या मालिकेचा निर्णय अखेरच्या सामन्यात होईल, हे चांगले लक्षण आहे.”कोहली कुठल्याही क्षणी मोठी खेळी करू शकतो. विराट भक्कम खेळाडू आहे. अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूला भक्कम राहायलाच हवे. चॅम्पियन खेळाडूचे लक्षणदेखील हेच आहे. धरमशाला येथे मोठ्या धावा काढून तो विजय मिळवून देईल, यात शंका नाही. फलंदाजीला आला, की चाहत्यांची त्याच्याकडून शतकाची अपेक्षा असते, असे क्लार्कने नमूद केले