मुंबई। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा दुखापतीमुळे तिसर्या कसोटीला मुकला होता.त्याच दुखापतीमुळे विराट आयपीएलमध्ये सहभागी हाईल की नाही? याबद्दल शंका निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात झालेल्या दुखापतीमधून विराट अजूनही सावरलेला नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यातला सहभाग हा अनिश्चित मानला जात आहे.
तंदुरुस्त होण्यासाठी काही आठवडे विश्रांतीची गरज
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या कसोटीत विराटला उजव्या खांद्याला रांचीमध्ये दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे त्याला धर्मशालाच्या चौथ्या कसोटीत खेळताही आले नाही. या दुखापतीतून सावरण्यासाठी विराटला आणखी काही आठवडे विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळेच आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो सहभागी होऊ शकेल का, या बाबत शंका निर्माण झाली आहे.आयपीएलचा सलामीचा सामना पाच एप्रिलला खेळवण्यात येणार असून, त्यात गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयस चॅलेंजर्स बंगलोरशी होणार आहे.पण शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी आपल्याला आणखी काही आठवडे विश्रांतीची गरज असल्याचं विराट कोहलीने धर्मशालातल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.