बंगळूरू । सध्या विराट कोहलीचे सर्वत्र एका वेगळ्याच कारणामुळे कौतुक होत आहे. विराटने भूतदयेचे दर्शन घडवताना अपंगत्व आलेल्या 15 कुत्र्यांना दत्तक घेतले आहे.
बंगळुरूमध्ये असताना वेळात वेळ काढून विराटने चार्ली अॅनिमल रेस्क्यू सेंटरला (केअर) भेट दिली. केंद्राच्या विश्वस्थ सुधा नारायणन या कोहलीच्या या भेटीची माहिती देताना म्हणाल्या, विराट आमच्या संस्थेला भेट देईल याची कल्पना नव्हती. आम्हाला केवळ व्हीआयपी भेटीबाबत माहिती देण्यात आली होती.