मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ट्विटर हँडलवर “Trailer: The Movie” चा फोटो पोस्ट केला होता. त्याचे टीझर त्याने आज लाँच केले.
विराटने त्याच्या ट्विटर हँडलवर 20 सप्टेंबरला एक पोस्ट शेअर केली होती. “Trailer: The Movie” असे टायटल असलेल्या फोटोत विराटने अॅक्शन हिरोप्रमाणे पोझ दिलेली पाहायला मिळाले होते. ”दहा वर्षांनंतर आणखी एक पदार्पण, आता वाट पाहवत नाही,” असे ट्विट केले होते. मंगळवारी जाहीर केलेल्या टीझरमध्येही विराटने एखाद्या अॅक्शन हिरोप्रमाणे एन्ट्री घेतली आहे.
Time to tease you guys with a small teaser. ???? https://t.co/wMju9mzDzh #TrailerTheMovie pic.twitter.com/Gl3ZZT20Ht
— Virat Kohli (@imVkohli) September 25, 2018
विराटची पत्नी अनुष्का शर्माबॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून विराटच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू आहे. मात्र, हे बॉलिवूड पदार्पणच आहे की कपड्यांच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट हे अद्याप स्पष्ट होत नाही.