लंडन – कोहलीने पुन्हा एक नवीन विक्रम आपल्या नावावर नोंदविले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात. विराट सर्वात कमी डावांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने 382 डावांमध्ये हा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर होता. लाराने ४११ डावांमध्ये हा विक्रम बनवला होता. तर तो सचिन तेंडुलकरला १८ हजार धावा करण्यासाठी ४१२ डाव खेळावे लागले होते.
इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत ६५.८८ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतक आणि ३ अर्धशतकांचाही समावेश आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावा करणारा चौथा भारतीय तर जगातला १५ वा खेळाडू ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी १८ हजार धावा केल्या आहेत.