विराटला स्टम्प मारण्याच्या विचारत होतो! कोवान

0

मेलबर्न । भारताने कांगारू विरूध्दची बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी जिकली असतली तरी भारताचा कर्णधार विराट कोहली याच्यावरील कांगारू संघाच्या खेळाडूचा राग शांत होतांना दिसत नाही आहे.विराट कोहलीवर प्रचंड व्देषाची कबुलीच कांगारूचा सलामीवीर फलंदाज एड कोवान याने नुकतीच दिली आहे.एका क्षणी राग इतका अनावर झाला होता की मैदानातील स्टम्प काढून तो कोहलीला भोककावे असे वाटले होते अशी प्रतिक्रिया कोवान दिली. भारताने कांगारूचा कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने जिंकली. मात्र, ही मालिक गाजली ती दोन्ही संघातील खेळाडूंमधील शाब्दिक वादामुळे. कांगारूचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने डीआरएसच्या नियमांचा भंग केल्यामुळे एका सामन्यात विराट कोहलीने त्याला तीव्र आक्षेप ेघेतला होता.

एका क्षणी विराटने मला अपशब्द वापरला
त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत शब्दयुद्ध रंगले. मालिका संपल्यानंतर स्मिथ आणि कोहली यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असतानाच कोवान याने धक्कादायक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. विराटशी झालेल्या वादाची आठवण सांगताना कोवान म्हणाला, ’भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत मी अगदी शांत होतो. पण एका क्षणी विराटने मला अपशब्द वापरला. त्याची ही टीका वैयक्तिक आणि अत्यंत अपमानास्पद होती. पण आपण काय बोलून बसलोय हे त्याच्या लक्षातच आले नव्हते . पंचांनी स्वत: पुढे येऊन विराटला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. तेव्हा आपण मर्यादा ओलांडल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने दिलगिरीही व्यक्त केली. पण त्याच्या बोलण्याने मी दुखावलो गेलो होतो. माझा राग अनावर झाला होता. त्यावेळी असे वाटले की स्टम्प उचलून त्याला बदडावा.मात्र स्वत:ला सावरत तो म्हणाला की, मी स्वत:विराट कोहलीचा मोठा चाहता आहे.