विराट-अनुष्काचे अखेर शुभमंगल

0

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सोहळा अखेर संपन्न झाला आहे. इटलीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून विराट आणि अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा होत्या. काही दिवसांपूर्वीच अनुष्काच्या प्रवक्त्याने लग्नाचे वृत्त धुडकावून लावले होते.

पण, आता थेट या लग्नसमारंभाची माहितीच उघड झाली. चित्रपट मॅगझीन फिल्मफेअरनेसुद्धा यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिला आहे. विराट-अनुष्काची लव्ह स्टोरी चार वर्षांपूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी हे दोघे पहिल्यांदा एका कमर्शिअल अ‍ॅडमध्ये एकत्र झळकले होते. त्यावेळी अनुष्काचे रणवीर सिंहसोबत ब्रेकअप झाले होते, तर विराटसुद्धा एकटाच होता. अशात दोघांमध्ये जवळीक वाढली, हळूहळू मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विराट-अनुष्काने कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. अनुष्का नेहमीच विचारला आपला चांगला मित्र असल्याचे सांगत होती.