विराट-अनुष्काचे शुभमंगल 9 डिसेंबरला?

0

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला विराट-अनुष्काचे शुभमंगल होणार असल्याचे समजते. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

इटलीत रंगणार विवाहसोहळा
इटलीमध्ये 9, 10 आणि 11 डिसेंबरला हा संपूर्ण विवाह सोहळा रंगणार असून हिंदू पद्धतीने लग्न पार पडणार असल्याचे समजते. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना संपला आहे. 10 डिसेंबरपासून श्रीलंका-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र विराटला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अति क्रिकेट आणि रोटेशन पॉलिसीमुळे विराट कोहलीला विश्रांती दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र विराटला लग्नासाठीच श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून मुक्त करण्यात आल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.