मुंबई : विराट कोहलीने अनुष्का शर्मा सोबतच्या साखरपुडाच्या बातमीचे खंडन केले आहे. शुक्रवारी ट्विटरवरून विराटने हे जाहीर केले की, माझा आणि अनुष्काचा साखरपुडा ठरलेला नाही. हे सर्व निराधार वृत्त आहे. माध्यमातून पसरलेल्या या अफवांमुळे दोघांच्या चाहत्यांची फसवणूक होत आहे. माझ्या साखरपुड्याचे वृत्त मी स्वतः जाहीर करून याची माहिती देईन.’ असे ट्विटरवर म्हंटले आहे. कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नववर्षात साखरपुडा करणार असल्याची बातमी कालच आली. मात्र त्याबाबत स्वत: विराट कोहलीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या विराट आणि अनुष्का न्यू इयर सेलिब्रेशनसाठी उत्तराखंडमधील नरेंद्रनगरच्या हॉटेल आनंदामध्ये आहेत. ज्या हॉटेलमध्ये दोघे थांबले आहेत, तिथे नातेवाईंकाचा राबता वाढत आहे. तसेच तसेच बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि उद्योगपती अनिल अंबानी यांसारखे पाहुणे उत्तराखंडमध्ये पोहोचल्याने, विराट-अनुष्काच्या साखरपुड्याबाबतच्या चर्चांनी जोर घेतला. अखेर आज स्वत: विराटनेच याबाबत मौन सोडत, ‘काही न्यूज चॅनेलवर आमच्या साखरपुड्याबाबत चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे हा गोंधळ दूर करुन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मी करत आहे’, असे म्हटले आहे.