विराट आक्रमक असल्यामुळे काही वेळा भिती वाटते

0

मुंबई । भारतीय संघाचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खुप आक्रमक कर्णधार म्हटले आहे. त्यामुळे काही वेळेस त्याला विराट आक्रमक झाल्यावर अश्विनाला ही भिती वाटते. अश्विनला विचारण्यात आले की, महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांची कर्णधार पदाचे कसे आकलन करणार? यावर उत्तर देतांना अश्विन म्हणाला की, कर्णधार पद सांभाळणे म्हणजे बिना फायद्यो काम असून यामध्ये अत्याधिक उर्जा खर्च कारावी लागते.तसेच कर्णधार पद सांभाळल्यावर पाच वर्षानंतर कोणालही निवृत्ती घ्यावी लागते. कर्णधार पद साभाळणे म्हणजे केवळ कोट घालून नाणेफेक करणे इतके मर्यादी काम नाही. तुम्हाला सिलेक्शन मिटिंग जाणे व 11 खेळाडूंची निवड करणे, ज्यांना 11च्या व्यतिरिक्त बाहेर ठेवले आहे. माध्यम प्रतिनिधीची संवाद साधाणे अशी कामे करावी लागतात.

विराट कोठेही सदैव राहतो आक्रमक
याबाबतीत एम.एस.धोनी काम उत्कृष्ट आहे. त्याने चाहत्यांचा दबाव साभाळून चांगले नेतृत्व केले. धोनी कर्णधार म्हणून एक मच्युयर्स व्यक्तीमत्व आहे. विराटला नुकतेच कर्णधार पद मिळाले असले तरी दोघांच्या व्यक्तीमत्वामध्ये मोठा फरक आहे. विराटला सामना करणे पसंत आहे. अडचणीवर आक्रमणपणे मात करणे त्याला आवडते. कधी कधी त्याच्या आक्रमतेला पाहून एक भिती वाटते. मुश्‍लिकपणे पुढे आश्‍विन म्हणाला की, कधी-कधी एखाद्या फिल्डरला त्याच्या जागेवरून हटवू कीनाही. विराट मात्र कुठल्या स्थानवरचा फिल्डर आक्रमक आहे की नाही असा कधीच विचार करित नाही. मागील दोन वर्षात तो एक चांगला कर्णधार व्यक्ती म्हणून मान्यता पावला आहे.