नवी दिल्ली । कोहलीने एका चांगला प्रशिक्षक अनिल कुंबळे याचा बळी घेतला.असा सुर क्रिकेट वर्तुळात चर्चिला जात आहे. यामागील कारण समोर येत आहे की,कर्णधार विराट कोहली व संघाने मंत्रणा करून फलंदाजी करण्याचे ठरले होते.मात्र नाणेफेक जिकल्यावर विराटने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे कोहलीने सुनियोजित पद्धतीने सगळा ’गेम’ केल्याचा संशय बळावला आहे. चॅम्पियन ट्राफीच्या अतिम सामन्यात पाक ने भारताला 319 धावाचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करतांना भारताच्या फलंदाजीचा धुव्वा उडाला.पाकविरुद्ध अंतिम सामन्यातही प्रथम फलंदाजी करायचे संघाने एकमताने ठरवले होते. पाकला लक्ष्यांचा पाठलाग करणे शक्य होणार नाही आणि जेतेपद आपल्याला पटकावता येईल, अशी रणनीती ठरली होती. पण, कोहली टॉससाठी मैदानावर गेला, टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण घेऊन परतला तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले होते, कुंबळेही अवाक झाला होता, असा घटनाक्रम सूत्राने सांगितला.विराट जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये आला, तेव्हा कुंबळेने मंत्रणाकरून घेतला निर्णय का बदला याबद्दल विचारले असता विराटने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळले. त्यामुळे संघातील वातावरण गढूळ झाले होते. त्याचे परिणाम काय झाले हे तर जगानेच पाहिले आहे.यावर विराट काय स्पष्टीकरण देतो याकडे लक्ष लागले आहे.