विराट कोहलीला मैदानात डिवचण्याचा प्रयत्न करू नका

0

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू माइक हसीने भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी स्लेजिंगबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीविरोधात स्लेजिंग करू नका, ते तुमच्यावर उलटू शकते, असा सल्ला माईक हसीने ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज सांघातील कसोटी मालिका आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे दोन्हीकडी आजी-माजी खेळाडूंकडून बोलंदाजी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर माईक हसीने ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना आपल्या अनुभवातील काही गोष्टी सांगितल्या आहेत. हसी म्हणतो, विराटविरोधात शाब्दिक शेरेबाजी केल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. शेरेबाजीमुळे चिडून विराटने मोठी खेळी केल्यास त्याचा फायदा यजमान संघाला मिळू शकतो.

दबाव निर्माण करण्याची शक्कल हास्यास्पद
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी याने भारतीय संघाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला एक सुचना देऊ केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ येत्या २३ फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ कसोटी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असून गेल्या वर्षभरात भारताच्या कसोटी संघाची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. कोहलीच्या आक्रमकतेने सर्वच प्रभावित झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही कोहलीच्या फलंदाजीचा धसका घेतला आहे. मायकेल हसी यालाही त्याचीच चिंता आहे. त्यामुळे हसीने विराट कोहलीला मैदानात डिवचण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिला आहे.

भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात स्टीव्ह स्मिथ याने दिलेल्या मुलाखतीत कोहली मैदानात वैतागलेला आणि रागावलेला पाहायला आम्हाला नक्की आवडेल, असे म्हटले होते. भारतीय फलंदाजांचे लक्ष विचलीत करणे आमच्यासाठी फायदेशीरच ठरेल, असा दावा स्मिथने केला होता. पण भारतीय संघाविरुद्ध खेळविल्या गेलेल्या अनेक चुरशीच्या लढतींचा साक्षीदार असलेल्या मिस्टर क्रिकेटर अर्थात मायकेल हसीने मात्र स्मिथला कोहलीपाहून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कोहलीला डिवचून त्याच्यावर दबाव निर्माण करण्याची शक्कल हास्यास्पद आहे. कोहली आक्रमक फलंदाज आहे, त्याला आणखी डिवचले तर तो आणखी चांगली कामगिरी करेल, असे हसीने म्हटले.