विराट कोहलीला विश्रांती,रोहीत शर्मा नवीन कर्णधार

0

नागपूर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली श्रीलंकाविरुद्ध कसोटी सामना झाल्यावर एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे, असे बीसीसीआयतर्फे जाहीर करण्यात आले. बीसीसीआयच्या निवड समितीने नागपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.

दक्षिण आफ्रिकेचा आगामी दौरा लक्षात घेऊन विराटला विश्रांती देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात खेळणार आहे, मात्र त्यानंतरच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. कसोटी सामन्यात विराटने उत्तम खेळीचे प्रदर्शन केले. सोमवारच्या सामन्यात विराटने द्विशतक झळकावल्याने भारताच्या विजयात मोठा हातभार लागला. हे द्विशतक विराट कोहलीच्या कारकीर्दीतील पाचवे द्विशतक होते. या बदलांशिवाय पंजाबचा गोलंदाज सिद्धार्थ कौल हा भारताच्या एक दिवसीय संघातला नवा चेहरा आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या 50 सामन्यांमध्ये 175 गडी बाद केले आहेत. सलामीच्या शिखर धवनने तिसर्‍या कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे.