विराट कोहली शतक हुकले

0

नॉटिंगहॅम : पहिल्या दोन कसोटी सपाटून हारलानंतर टीकेचे लक्ष्य बनलेल्या भारतीय संघाने सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी आकर्षक फलंदाजी करून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याचे संकेत दिले.

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ५ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारली होती. वृत्त हाती आले तेव्हा कोहलीचे शतक अ‌वघ्या तीन धावांनी हुकले. कोहलीने पहिल्या सामन्यात शतक ठोकले होते. पण यावेळी त्याची ती संधी हुकली. कोहलीने १५२ चेंडूंत ११ चौकारांसह ९७ धावांची खेळी केली.