नवी दिल्ली-ट्रेंट ब्रिज कसोटी जिंकून भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दणक्यात पुनरागमन केले आहे. ही मेहनत वाया जाता कामा नये, त्यासाठी कामगिरीतील सातत्य आणि अंगातील जोश कायम ठेवत पिछाडी भरून काढून टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची ही मालिका जिंकायला हवी. एकूणच ही मालिका आता खुली झाली असून विजयाची उभय संघांना समसमान संधी आहे. भारतीय संघाची कामगिरी एकूणच उंचावली. आपले सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल हे दोघे अपयशी ठरले; पण त्यांनी दोन्ही डावांत अर्धशतकी सलामी दिली.
राटने ट्रेंटब्रिजला दुसऱ्या डावात केलेल्या १०३ धावा तर दर्दी क्रिकेटप्रेमींना अधिक सुखद वाटल्या असतील. यामुळे सुरुवातीचे दडपण कमी झालेच. डावाला सकारात्मक सुरुवातही मिळाली. आपले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या फलंदाजांकडून धावा झाल्या. त्यांनी भागीदारी बड्या भागीदारी रचताना ख्रिजवर पाय रोवले. परदेशात खेळताना खेळपट्टीवर टीकाव धरून स्थिरावणे खूप महत्त्वाचे असते. यामुळे आत्मविश्वास मिळतो.
कर्णधार विराट कोहलीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. तो आपल्याला निराश करत नाही. याच मालिकेत त्याने दोनवेळा कसोटीत दोनशे धावा केल्या. वित्याने आखलेल्या डावपेचांची साथ अखेरपर्यंत सोडली नाही. यावरून त्यांची मानसिक ताकद दिसून येते. माझ्यासाठी तो केव्हाच लिजन्ड झाला आहे. सध्याच्या घडीला तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.