विरावलीत पाण्याच्या टाकीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

यावल : तालुक्यातील विरावली येथे 47 वर्षीय प्रौढाचा पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. उत्तम देवराम अडकमोल (47) असे मृताचे नाव आहे. विरावली येथील जि.प.शाळेसमोर ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ उत्तम देवराम अडकमोल (47) वास्तव्यास असून सोमवारी दुपारी ते साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक ते पाण्याच्या टाकीवर गेले. तेथून ते खाली कोसळल्याचे लक्षात येताच जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.