नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरी लवकरच नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून नवीन वर्षात कोहली कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. क्रिकेटर विराट कोहलीने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज दिली. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
मागील महिन्यात भारतीय क्रिकेट संघातील हार्दिक पांड्या देखील बाप झाला. हार्दिक आणि नताशाला मुलगा झाला. त्यानंतर आता विराट कोहलीने गुड न्यूज दिली आहे.