विरोधकांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव; मोदी, शहांचा फोन

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. युपीएमधील नेत्यांसोबतच एनडीएमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटच्या माध्यमातून पवारांना शुभेछ्या देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी फोनद्वारे पवारांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबरोबच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

चंद्रकांत पाटीलांकडून शुभेच्छा सेनेला टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे अभिष्टचिंतन करताना ट्वीट केले आहे. ‘राजकारणात मतभेद नेहमीच पाहायला मिळतील, पण मनभेद कधीच नाही. असेच भिन्न विचारसरणीचे, तरीही अनेक राजकारण्यांचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांचा आज वाढदिवस. शरद पवारांना राजकारणाचा तब्बल ५० वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तीनवेळा पदभार सांभाळला आहे. राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा त्यांचा निर्णय विशेष उल्लेखनीय आहे.’

करोना काळातही वयाची पर्वा न करता, आपल्या मित्र पक्षातील काही नेत्यांना लाजवतील असे दौरे त्यांनी केले, असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. राजकारणात आपले विचार व आदर्श वेगळे राहतील, मात्र राज्याच्या जनतेच्या हितासाठी आपण सरकारला व सरकारच्या बाहेर देखील मार्गदर्शन करात राहाल. तुमच्या अनुभवाचा फायदा आघाडी सरकारला व्हावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.