विरोधकांचाही पबचा व्यवसाय…!

0

नंदुरबार । आम्ही दारूचे धंदे करतो, असे आ.चंद्रकांत रघुवंशी हे सांगतात. परंतु पुणे येथे स्वतःच्या मुलाचा व्यवसाय पबचा आहे, हे सांगत नाही, अशी तोफ नगराध्यक्षपदाचे भाजपाचे उमेदवार डॉ.रवींद्र चौधरी यांनी डागली. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग 19 मधील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री गांधीनगर येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. या सभेत ते बोलत होते.

पुराव्यांची कागपत्रे वाटली
डॉ.रवींद्र चौधरी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत होते. ते म्हणाले की, तरूणांच्या आणि महिलांच्या रोजगारासाठी मी व्हीजन घेवून आलो आहे पण विरोधक त्याला युटर्न देत दिशाभूल करीत आहेत. आम्ही दारूचा व्यवसाय करतो, असे ते सांगतात. परंतु स्वतःच्या मुलांचा पुणे येथे पब आहेत, हे का सांगत नाही. दारूच्या कारखान्यासाठी त्यांच्याच वारसांनी औरंगाबाद येथे प्रस्ताव टाकला आहे, हे का लपवितात, असा प्रश्‍न उपस्थित करून डॉ.रविंद्र चौधरी यांनी पुराव्यांचे कागदपत्र वाटप केले. नंदुरबार तालुका विधायक समितीच्या संस्थेत प्राचार्य होण्यासाठी पात्रता असतांनाही मराठा व पाटील लोकांना टाकले जाते, याचा विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे, असे आवाहन त्यांनी प्रचारसभेतून केले. यावेळी व्यासपीठावर खा.हिना गावित यांच्यासह प्रभागातील तीनही उमेदवार उपस्थित होते.