मालदा- आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसला तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आव्हान देण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, आज मालदा येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शनिवारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या महारॅलीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली. विरोधी पक्षांनी केलेली महाआघाडी ही सेल्फी महाआघाडी असल्याचा टोला शहा यांनी लगावला.
बंगालमध्ये दुर्गा पूजा विसर्जन आणि सरस्वती पूजनासाठी परवानगी मिळत नाही. आता दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही तर काय पाकिस्तानमध्ये करायचे का? असा सवाल अमित शहांनी केला.
रथयात्रा, रोहिंग्यांच्या प्रश्न, नागरिकत्व संशोधन विधेयक, दुर्गापूजा विसर्जन यासह अनेक मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न केला.