विरोधकांच्या सभेला गर्दी होत नसेल तर आमचे कार्यकर्ते पाठवतो- बाळासाहेब थोरात

0
संगमनेर – गेली ३५ वर्ष राजकारणात विरोधकांना किल्न बोल्ड करणारे राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात  पुन्हा एकादा  आपल्या विरोधकांची विकेट  घेण्याच्या तयारीत आहेत . कारण   विरोधकांच्या सभेला गर्दी होत ,नसेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते  पाठवू असा खोचक टोला त्यांनी आपल्या विरोधकांना संगमनेर तालुक्यातील निमोण येथे  झालेल्या  शेतकरी मेळाव्यात  लगावला आहे .  संगमनेर तालुका हा सुसंस्कृत राजकारण व विचारांचा राहिला आहे. खालच्या पातळीवर येथे कधीच टिका झाली नाही. विरोधकांचा ही आम्ही नेहमी सन्मान केला.35 वर्षात विरोधी उमेदवार असलेल्यानी हि परंपरा जपली. मात्र सध्या तालुक्यात काही म्हसणवट्यातील पुढारी असून त्यांची भाषणे कोणी ऐकत नसल्याने त्यांना म्हसणवट्यात स्फूरण येते ते दहावे,मौत या ठिकाणीही भाषण करुन टिका करण्याचा प्रयत्न करतात.त्यांनी सभा घ्यावी टिका करावी.सभेला गर्दी होत नसेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते पाठवू पण दुखाच्या ठिकाणी राजकीय भाषणे करु नका असा टोला आमदार थोरातांनी तालुक्यातील काही स्थानिक पुढार्‍यांना लगवला आहे . या शेतकरी मेळाव्यास आमदार डॉ.सुधीर तांबे,अ‍ॅड.माधवराव कानवडे, नगराध्यक्ष.दुर्गा तांबे,  आदींसह  नागरिक,महिला,युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ .विखेंना वयाचे भान नाही       
सुसंस्कृत राजकारणाची येथे परंपरा आहे.  आपण 35 वर्षाच्या राजकारणात ऐकली नाही अशी टिका डॉ . सुजय विखेंनी   केली . स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर व्यक्ती  व्देशाने  आम्ही कधीही टिका केली नाही. विधानसभेतील सर्वात वरिष्ठ आमदार व काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च बॉडीचा मी सदस्य असून सुजय विखेंनी वयाचे भान न ठेवता केलेली टिका वाईट वाटणारी असल्याच आमदार थोरात यांनी म्हटल आहे .
पक्षात राहुन  विरोध
गोरगरिबांच्या हितासाठी काँग्रेसचा विचार हाच देशाला पूरक आहे. भाजप सरकार हे हुकूमशाहीकडे वाटचाल करत असून नोटाबंदी,जीएसटी,भरमसाठ भाववाढ व देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था ही अधोगतीकडे नेणारी आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने बळीराजाचा अपमान केला आहे.शेतकर्‍यांचा तळतळात त्यांना संपविल्या शिवाय राहणार नाही .काहीजण पक्षात राहुनही विरोध करतात.त्यांनी आपली पात्रता तपासून पाहिली पाहिजे. असा टोला विखेंना नाशिक पद्वीधरचे आमदार डॉ . सुधीर तांबे यांनी लगावला