सावदा । नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 29 रोजी सकाळी 11 वा पालिकेच्या सभागृहात संपन्न झाली अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले या होत्या, सदर सभा विरोधकांच्या आरोप प्रत्यारोप तसेच विरोधकांनी विविध कामे परस्पर होत आहे विचारात घेतले जात नाही तसेच सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करीत सभात्याग केल्याने गाजली. सभा सरु होताच प्रथम मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, हा विषय पटलावर होता तो सुरु असतानाच विरोधी गटातील नगरसेवक राजेश वानखेडे व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी आम्ही दिलेले विषय सभेत का घेण्यात आले नाही याची विचारणा केली, कामे नगरपालिका करते विषय सर्व नगरसेवक मिळून मंजूर करतात पण काही लोक याचे श्रेय घेऊन राजकारण करण्याचा प्रत्यन करीत आहे. सोशल मिडीयावर देखील हाच प्रचार केला. जात असल्याचा मुद्दा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी मांडला यास नगरसेवक राजेश वानखेडे व विरोधी गटनेते फिरोज खान यांनी देखील जोड दिली व शहरात मागील मंजूर कामे असताना ती खोळंबून नवीन कामे करण्यात येते आहे.
जुनी कामे थांबवून नव्या कामांना मंजुरी
वास्तविक नवीन कामांसाठी निधी अद्याप आलेला नसताना मागील मंजूर कामावरील निधी वापरण्यात येत आहे, हा चुकीचा पायंडा असून मागील मजूर कामे त्यासाठी आलेल्या निधीतूनच पूर्ण व्हावी असा मुद्दा मांडला यास राजेंद्र चौधरी यांनी समर्थन दिले यावेळी, स्वच्छतेबाबतीत देखील विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला. शहरात कचरा उचलण्यासाठी ठेका दिला असताना सदर ठेकेदार काम व्यवस्थित करीत नाही तर त्यांची माणसे हि आमची बिले पास झाली नसल्याने पगार नसल्याचे सांगतात, शिक्षक बदलीबाबत चुकीचे धोरण अवलंबले असल्याचा आरोप झाला.
जनहितासाठी काम करा
जेष्ठतेप्रमाणे बदली होणे होणे अपेक्षित होते, तर पाणीपुरवठा फिल्टरवरुन पावती न फाडता परस्पर काही लोकांचे फोनवर पाणी टँकर भरुन दिले जातात असा देखील आरोप यावेळी विरोधकांनी केला, तर विरोधी गटनेता फिरोजखान व नगरसेवक किशोर बेंडाळे यांनी उर्दू शाळा व कन्या शाळेत विद्यार्थ्यांना पाणी मिळत नसल्याचा मुद्दा तसेच ख्वाजानगर भागात देखील सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा यावेळी मांडला, राजेंद्र चौधरी यांनी आम्ही सांगितलेले विषय घेतले न जाता सांगितलेली कामे होत नाही बदला घेण्यासाठी राजकारण करु नका असे सांगतानाच सत्ता मिळाली आहे त्याचा उपयोग जनतेच्या कामांसाठी करा, वाद करीत वेळ घालविण्यापेक्षा कामे करण्यात वेळ घालवा असे सांगितले.
बाहेरील लोकांचा हस्तक्षेप
पालिकेत बाहेरील लोकांचा हस्तक्षेप असतो कामकाजात तसेच नगराध्यक्ष दालनात देखील बाहेरील लोक असतात अशा वेळी आम्हास नगराध्यक्षाशी कामकाज बाबत बोलता येत नाही. त्यामुळे येथे बाहेरील लोकांचा हस्तक्षेप थांबावा असे सांगताच या बाबतचा जी.आर.यावेळी मुख्याधिकारी यांना दाखविला, याच वेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी विरोधकांनी बोलू देण्यात येत नसल्यास आम्ही सभेत बसत नाही असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक सोबत घेत विरोधी नगरसेवकांनी सभा त्याग केला.