विरोधक शेतकऱ्यांसाठी खोटे अश्रू काढत आहे -मोदी

0

लखनौ-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी बन्सगर कॅनाल प्रकल्पाचे उदघाटन तसेच उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मेडिकल कॉलेजची पायाभरणी केली. उद्घाटनानंतर मिर्झापुरमध्ये एका जाहीर सभेत मोदी यांनी मागील सरकारवर व विरोधी पक्षावर हल्ला केला. मागील सरकारने विकास कामे न करता लोकांना दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदींनी केला.

शेतकऱ्यांसाठी खोटे अश्रू
‘ज्या शेतकऱ्यांसाठी विरोधक खोटे अश्रू वाहत आहेत, त्यांनी त्यांच्या हातात सत्ता असतांना अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण का केले नाहीत असा प्रश्नही मोदींनी केला आहे. गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशच्या जनतेसाठी मला विकासाचे अनेक प्रकल्प समर्पित करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगत विविध योजनांची माहिती दिली.

महत्त्वाकांक्षी बंसगर कॅनाल प्रकल्पाचा संदर्भ देत ते म्हणाले की, या प्रकल्पामुळे सिंचन वाढीस प्रोत्साहन मिळणार आहे. मागील सरकारने जर हा प्रकल्प (बंसगर ) पूर्ण केला असता तर त्यावेळी फक्त 300 कोटी खर्च आला असता. सध्याच्या 3,500 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे मोदींनी सांगितले.