विरोधीपक्षनेते मुंडे यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण

0

नंदुरबार। शहरात नगरपालिकेने केलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा 13 आगस्ट रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. नंदुरबाराचे विकास पुरुष आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने लोकनेते दादासाहेब बटेसिन्ह रघुवंशी उद्यान, तसेच डॉ.ए. पी.जे. कलाम ई लायब्ररी, आरोग्य सुविधा केंद्र उभारले आहे.

या विकास कामांचा लोकार्पण सोहळा रविवारी सकाळी 11 वाजता विरोधपक्षनेते धनंजय मुंडे, व राधाकृष्ण पाटील यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याला धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. शिवाजी नाट्यमंदिरात होणार्‍या या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थिती रहावे असे आवाहन नगराध्यक्ष रत्नाताई रघुवंशी, उपनगराध्यक्ष राजेन्द्र माळी, बांधकाम सभापती निखिल रघुवंशी यांनी केले आहे.