पुणे । शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष रमेश बागवे व बाळासाहेब शिवरकर यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिवरकर म्हणाले, विलासराव मुख्यमंत्री असताना ‘माहितीचा अधिकार’ हा कायदा मंजूर केला. त्यांनी शेती, पाटबंधारे, शिक्षण क्षेत्रात अतुलनिय कामगिरी केली आणि महाराष्ट्राचे नाव प्रगतीपथावर नेऊन पोहचविले. महापालिकेच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करावे असा प्रस्ताव रामकृष्ण मोरे यांनी देशमुख यांच्याकडे मांडला व त्यांनी तात्काळ या प्रस्तावास मंजूरी दिली त्यामुळे आज गोरगरीब जनतेची मुले महापालिकेच्या शाळेमध्ये इंग्रजी शिक्षण घेत आहे. यावेळी मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर, द. स. पोळेकर, नरेंद्र व्यवहारे, जयकुमार ठोंबरे, राजेंद्र पेशने, सतिश पवार, सतिश मोहोळ, रवि आरडे, उत्तम भूमकर, सुनिल मोझे, अनिल अवटी, मनोहर गाडेकर, हरिदास अडसूळ, विवेक गुडमेटी, नाना भेगडे, सुरेश उकिरंडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे उपस्थित होते.