विलोभनीय दृश्याला ढगाचे ग्रहण; मोदींसह देशभरातील जनतेची नाराजी !

0

नवी दिल्ली: आज बुधवारी दशकभरानंतर दुर्लभ कंकणाकृती सूर्यग्रहणाची अनुभूत संपूर्ण देशाला आली. मात्र सकाळी ज्यावेळेला हे ग्रहण होते, नेमका त्याच वेळेस ढगाळ वातावरण झाल्याने ग्रहण बघण्यासाठी आतुर असलेल्यांच्या आशेवर पाणी फिरले. इतकेच काय तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मोठ्या उत्सुकतेने ग्रहण बघण्याची तयारी केली होती. मात्र त्यानाही दर्शन होऊ शकले नाही. भारतासह जगभरातील अनेक देशातील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य बघण्याची संधी होती. मात्र ती हुकल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी हा ग्रहण डोळ्यात साठवून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होते. पण, ऐनवेळी पंतप्रधानांना लाईव्ह प्रक्षेपणाद्वारेच सूर्यग्रहण बघावे लागले. मोदींनी ट्वीटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.

‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहण आज गुरूवारी बघायला मिळाले. यंदाच्या वर्षांतील हे शेवटचे सूर्यग्रहण होते. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून भारत, सौदी अरेबिया, कतार, मलेशिया,ओमान, सिंगापूर, श्रीलंका, मरिना बेटे व बोरनिओ येथील नागरिकांना हे सूर्यग्रहण बघता आले. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यानंतर कंकणाकृती सूर्यग्रहणाला सुरूवात झाली. भारतात सकाळी ७.५९ वाजता ग्रहणाला सुरुवात झाली. कंकणाकृती अवस्था सकाळी ९ वाजता दिसून आली.