वरणगाव । विल्हाळे विकास सोसायटीची निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. ही निवडणूक 13 जागांसाठी आहे. शनिवार 1 रोजी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोसायटीच्या विविध प्रवर्गातील पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरीत जागा देखील बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहीती योगेश उर्फ नागो पाटील यांनी दिली.
निवडणूकीच्या रिंगणात यांचा आहे समावेश
विल्हाळे विकास सोसायटीची निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. शनिवार 1 रोजी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस होता. यासाठी भाजपाचे पॅनल माजीमंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले आहे. इतर मागासवर्गीय गटात अशोक शिंदे, महिला राखीव गटात सुलभी पाटील, भारती पाटील, अनुजाती गटात कृष्णा ठोके, मागासवर्गीय गटात गोविंदा सुरवाडे यांच्या विरूध्द एकही अर्ज न आल्याने 13 पैकी 5 जागा बिनविरोध आल्या आहेत. तस उर्वरीत 8 जागांसाठी योगेश पाटील, दिनेश पाटील, विजय पाटील, दिनकर पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, प्रदिप पाटील, शशिकांत पाटिल, सुधाकर पाटील, सुभाष बाऊस्कर हे भाजपाच्या पॅनलमध्ये तर विद्यमान अध्यक्ष प्रल्हाद पाटील हे अपक्ष म्हणुन या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार
सोमवार 3 रोजी अर्ज छाननी व मंगळवार 4 रोजी माघारी असल्याने भाजपाच्या पॅनल मधुन 10 पैकी 2 उमेदवारांचे अर्ज माघारी होणार आहेत व उर्वरीत आठ जागासाठी आठ उमेदवार असणार आहेत तर एकच अपक्ष उमेदवार प्रल्हाद पाटील अश्या 9 उमेद्वारांमधे निवडणुक रंगणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विनायक पाटील, नारायण पाटील, राजेंद्र सुरवाडे परिश्रम घेत आहे. सदरची निवडणुक बिनविरोध होईल का हे मंगळवार 4 च्या अर्ज माघारीनंतर लक्षात येईल.