विळीने गळा चिरुन घेत तरुणाची आत्महत्या

0
चिंचवड : बिजलीनगर येथे एका तरुणाने घरातच भाजी चिरायच्या विळीने गळा चिरून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 15) पहाटे चारच्या सुमारास घडली. दत्तात्रय शिवाजी पाचकवडे (वय 34, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली दत्तात्रय पाचकवडे (वय 30) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीला जाग येताच हा सारा प्रकार उघडकीस आला. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले व पुढे वायसीएम रुग्णालयात दाखल केले. सकाळी पावणे अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.