रावेर- तालुक्यातील विवरे खुर्द येथील सरपंच दिलीप पाटील यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा मंंगळवारी पंचायत समिती कार्यालयात सभापती माधुरी नेमाडे यांच्याकडे सोपवला. विवरे खुर्द येथील सरपंच दिलीप पाटील यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे यांच्याकडे सोपवला. दिलीप पाटील अनुभवी सरपंच असून विवरे खुर्द ग्रामपंचायतीत त्यांच्या परीवारातल्या सदस्यांनी सरपंच पदे भूषवली आहेत. त्यांच्या काळात गावात अनेक विकासकामे झाली आहेत. शैक्षणिक, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, घरकुल अश्या अनेक विषयात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे मात्र त्यांनी अचानकपणे दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात व गावात आश्चर्य व्यक्त होत आहे.