रावेर-तालुक्यातील विवरे बु॥ येथील डॉ आंबेडकर नगरातील रहिवाशी सौ निकिता रतिराम गाढे ( वय २३ वर्ष ) या विवाहित महिलेने राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली . चार ते पाच महिन्यापुर्वीच दुसरे लग्न ( गंधर्व ) झाले होते . वैदयकिय अधिकाऱ्याच्या अहवालात ती गर्भवती असल्याचे दिसुन आले. वैद्यकिय अधिकारी डॉ बी बी बारेला यांनी शवविच्छेदन केले.रतिराम गाढे यांनी खबर दिल्यावरून निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकडे व पोलीस कर्मचारी करित आहे .