मित्रांमुळेच नवीन काही उभारणीसाठी मिळतो आधार -वासुदेव नरवाडे
रावेर- शिक्षणाचा वापर करून उद्योग उभारण्याची गरज असून मजबुत विचारसरणीसोबतच नेहमी इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती ठेवा व मित्रांमुळेच नवीन काही उभारण्यासाठी आधार मिळतो आणि हिंमत येते, असे विचार विवरे येथे 1991 च्या दहावीच्या विद्यार्थी मेळाव्यात माजी सरपंच तथा विद्यार्थी वासुदेव नरवाडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना केले. 1991 या वर्षात इयत्ता दहावीत शिकणार्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल 28 वर्षांनी श्री.ग.गो बेंडाळे हायस्कूलच्या पटांगणावर रंगला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.के.नेमाडे होते .
जुन्या आठवणींना उजाळा देताना तरळले आनंदाश्रू
प्रास्ताविक उज्वल चौधरी यांनी केले. शिक्षक पी.के.नेमाडे, सोनजी नेमाडे, लिलावती सरोदे यासह शिक्षकांचा सत्कार नरेंद्र बेंडाळे, विजय नरवाडे, वासुदेव नरवाडे, विद्या राणे, लीना राणे, मीना तडवी, उदय होले, विजय पाटील, वैशाली लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकुटुंब परीचय दिला. शाळेच्या पटांगणावर जुन्या आठवणींना उजाळा देतांना विद्यार्थ्यांच डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. 1991 मध्ये दहावीत असताना ज्या वर्गात बेंचवर बसायचे त्या बेंचवर बसुन आनंदाचे क्षण अनुभवणत आले तसेच पटांगणाची स्वच्छता करून सर्वांनी भरीत पार्टीचा आस्वाद घेत स्नेहभोजन केले. पी.के.नेमाडे, एस.डी.नेमाडे, एस.आर.वायकोळे, एस.डी.भंगाळे, आर.एल.बैरागी, आर.जी.भंगाळे, एल.जे.तळेले, लिलावती सरोदे, ए.जी.महाजन, उषा कोलते, नीलिमा नेमाडे या शिक्षकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वासुदेव नरवाडे यांनी तर आभार किसन पाटील यांनी मानले.
या विद्यार्थ्यांची होती उपस्थिती
वासुदेव नरवाडे, संदीप सरोदे, नरेंद्र बेंडाळे, विजय नरवाडे, उदय होले, विद्या राणे, देविदास मोपारी, सुनील पाटील, दीपाली भिरुड, संजय राणे, विद्या चौधरी, मीना तडवी, संगीता जुनघरे, वैशाली लोखंडे, नीलिमा राणे, पौर्णिमा तळेले, रंजना पाटील, लीना राणे, कल्पना लुले, नंदा पाटील, उषा पाटील, मनिषा पिंपळे, कुंदा सपकाळ, प्रमोद पाटणकर, उज्ज्वल चौधरी, मनिष बेंडाळे, योगीराज कुरकुरे, हेमंत नेमाडे, अजित राणे, मनोज तळेले, देविदास मोपारी, सुनील पाटील, हिरामण वानखेडे, संभाजी पाटील, राजेश तळेकर, विशाल पाटील, सुनील लोखंडे, प्रशांत राणे, अरुण विवरेकर यासह विद्यार्थी उपस्थित होते .
आई-वडीलांचा सांभाळ करण्यापेक्षा दुसरे पुण्य नाही -नेमाडे
कुटुंबातील नवरा व बायको ही रथाची दोन चाके असून समतोल राखल्याशिवाय प्रवास करता येत नाही. जीवनात आई-वडीलांचा सांभाळ करणे यापेक्षा दुसरे पुण्य नाही. त्यांच्या भावनांची योग्य कदर करणे हेच खरे शिक्षण असून मुलांवर योग्य संस्कार करा, त्यासाठी शिस्त महत्वाची आहे. शिक्षा द्यायची की शिस्त हे पालकांनीच ठरवावे, असे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.के.नेमाडे म्हणाले.
खेळाडूवृत्तीने जीवन जगल्यास आनंद -लीना राणे
शालेय खेळांमुळे निरोगी व सुदृढ आरोग्य लाभते. आरोग्याचा समतोल राखण्याचे काम मैदानी, सांघिक खेळ करतात आणि हे खेळ शालेय जीवनात शिकायला मिळते. खेळांमधील जय-पराजय योग्य मार्ग दाखवितात. खेळाडूवृत्तीने जीवन जगले तर आनंदच आनंद मिळतो व आपल्या सभोवती सकारात्मक शक्ती निर्माण होते, अशी भावना माजी विद्यार्थिनी लीना राणे (पुणे) यांनी व्यक्त केली.