भांडण सोडवताना मारला चाकू ; मित्रही गंभीर
विवरा, ता.रावेर: रोजगाराच्या शोधार्थ पुण्यात गेलेल्या विवरा येथील तरुणाचा भांडण सोडवताना चाकू लागल्याने जागीच मृत्यू झाला. 22 रोजी ही घटना घडली तर या घटनेत तरुणाचा मित्रही जखमी झाला. विवरा येथील प्रफुल्ल उर्फ दिनेश निवृत्ती पाटील (21) हा तरुण रोजगाराच्या शोधार्थ पंधरा दिवसांपूर्वीच पुण्यात गेला होता.
पुणयातील वस्तीत प्रफुल्लचा मित्र अतुल गाढे व इतरांचे भांडण सुरू असताना ते सोडवण्यासाठी प्रफुल्ल गेल्यानंतर चाळीसगावच्या समाधान रामदास मोरे व चेतन मोरे या सख्ख्या भावांनी चाकूने हल्ला चढवल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मित्र अतुलदेखील गंभीर जखमी झाला.