निंभोरा बु.॥- येथून जवळच विवरा बु.॥ येथे घराच्या भिंतीवर भांडी धुण्याचे पाणी फेकल्याच्या रागातून संशयीत आरोपी मधुकर धुमा गाढे (रा.विवरा) याने बकरीचा चारा कापण्याच्या बख्खीने इंद्रायणी पाव्हणू गाढे यांना जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. जखमी महिलेवर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत जखमी महिला यांच्या सून सुनीता भिका गाढे यांच्या फिर्यादिवरून निंभोरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अन्वर तडवी करीत आहेत.