विवाहाच्या एक दिवस आधी नववधूची आत्महत्या

0

चिंचवड : लग्न अगदी एक दिवसावर आले असताना नवरीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. चिंचवड येथे नव्या नवरीने राहत्या घरी मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता गळफास घेतला. सीमा दिलीप सकाटे (वय 22, रा. विद्यानागर) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाचे गुरूवारी (14 डिसेंबर) लग्न होते.

घरात लगीन घाई सुरू होती. घरातील सगळी मंडळी लग्नाचा बसता घेण्यासाठी खरेदीला गेले होते. हातावर मेहंदी काढल्यामुळे सीमा घरीच होती व तिच्या सोबतीला तिची छोटी बहीण देखील घरीच होती. मात्र बहीण घराबाहेर जाताच तिने घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. बहीण जेव्हा परत आली तेव्हा हा सारा प्रकार उघडकीस आला. या सार्‍या प्रकारामुळे लग्नघरावरच शोककळा पसरली. ज्या घरातून तिची वरात निघणार होती त्याच घरातून तिची अंतयात्रा निघाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या आत्महत्येचे अद्याप कारण कळले नसून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.