जळगाव – घर बांधण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेवून ये असे सांगत वारंवार विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करणार्या पतीसह सासू सासर्यांविरुद्ध रामानंद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, शहरातील भगवान नगरातील रहिवासी असलेल्या लता गोपाळ बिरारी यांना त्यांचे पती गोपाळ सुरेश बिरारी, सासू लिनाबाई सुरेश बिरारी व सासरे सुरेश प्रल्हाद बिरारी हे तीघ रा. महाकाली चौक पवननगर नाशिक, या तीघांकडून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी लता बिरारी यांच्याकडे वारंवार केली जात नव्हती. परंतु लता बिरारी यांनी पैसे न आणल्यामुळे पतीसह सासू सासरे यांच्याकडून लता बिरारी यांना मानसिक व शारिरीक छळ करीत त्यांना वारंवार मारहाण केली जात होती. दरम्यान आज लता बिरारी यांच्या फिर्यादीवरुन पतीसह सासू सासर्यांविरुद्ध रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वसंत बेलदार हे करीत आहे.