विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग : दाम्पत्याविरोधात गुन्हा
विवरा येथील दाम्पत्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल : आरोपींनी विवाहितेची सोशल मिडीयाद्वारे केली बदनामी
भुसावळ : यावल तालुक्यातील एका गावातील 31 वर्षीय विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी तसेच विनयभंग करून विवाहितेची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी विवरे गावातील गोपाळ हरीचंद्र इंगळे व त्याची पत्नी रंजना गोपाळ इंगळे (रा. विवरा, ता.रावेर) या दाम्पत्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. फैजपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपासाला वेग दिला आहे.
विवाहितेशी संभाषण साधत शरीरसुखाची मागणी
यावल तालुक्यातील एका गावातील 31 वर्षीय पिडीतेच्या तक्रारीनुसार, त्यांच्या भ्रमणध्वनीवर संशयीत आरोपी गोपाळ इंगळे याने 12 फेब्रुवारी रोजी मोबाईलवर फोन लावून शरीरसुखाची मागणी केली मात्र त्यास नकार दिल्याने आरोपीने जीवे ठार मारण्याची धमकी देत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत करून विनयभंग केला तसेच संशयीत आरोपी रंजना इंगळे हिने सोशल नेटवर्कवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून विवाहितेची बदनामी केली. या प्रकरणी पीडीतेने फैजपूर पोलिसात मंगळवारी धाव घेत तक्रार दिल्यानंतर विवरा येथील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस कर्मचारी सुशीला भिलाला यांनी तक्रार जाणून घेतली. पुढील तपास फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहे.