विवाहितेचा छळ करणार्‍यांविरुध्द गुन्हा

0

जळगाव। शहरातील वाघनगर येथील रहिवाशी सुनिता निलेश राठोड (वय 26) यांचा विवाह निलेश आंनदा राठोड यांच्याशी झाला. 3 फेब्रुवारी 2012 नंतर तीन ते चार महिन्यापासुन 14 फेब्रवारी 2016 पर्यंत सुनिता यांचा लग्नात हुंडा कमी दिला म्हणुन गांजपाठ सुरु होता.

तसेच माहेरुन 5 लाख रुपये आणावे यासाठी त्यांच्या अंगावरीत दागिने काढुन त्यांना मारहाण व शिवीगाळ करीत दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसांत सुनीता राठोड यांच्या फिर्यादीवरुन निलेश आनंदा राठोड, आनंदा भिमसिंग राठोड, कमलबाई राठोड, सुमित राठोड सर्व राहणार नाशिक येथील अशोकनगरमधील सातपुर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. विजय निकुंभ करीत आहेत.