धुळे। स्वयंपाक व घरकाम येत नाही आणि घर दुरूस्तीसाठी माहेरुन 50 हजार रुपये आणावेत, या कारणावरून विवाहितेला हाताबुक्क्याने मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात सासरकडील 6 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील देवपूर भागात असलेल्या आंबेडकर नगरातील रहिवासी संगीता राणू ढाले (25)या विवाहितेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचा पती राणू शिवाजी ढाले, सासू सुमनबाई शिवाजी ढाले, सासरे शिवाजी खंडू ढाले, दीर प्रकाश शिवाजी ढाले, विकास शिवाजी ढाले, नणंद जनाबाई बाबूराव ढाले सर्व रा.मानवली, ता.जि.परभणी या 6 जणांनी दि. 13 एप्रिल 2014 ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत तिला घरकाम व स्वयंपाक येत नाही आणि घर दुरूस्तीसाठी माहेरुन 50 हजार रुपये आणावेत, या कारणावरून संगनमत करुन हाताबुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार वरील 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीव्ही संच, बॅटरीची चोरी
शहरातील देवपूर भागात असलेल्या श्रीराम कॉलनीतील प्लॉट नं. 64 मध्ये राहणारे प्रशांत रवींद्र जोशी यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी दि. 26 रोजी रात्री घरात प्रवेश केला आणि घरातील 10 हजार रुपये किमतीचा 24 इंची टीव्ही, 10 हजार रुपये किमतीची इनव्हरट्ररची बॅटरी असा एकूण 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्रशांत जोशी यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंवि कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेला मारहाण ; चौघांवर गुन्हा
शहरातील अंबिका नगरातील मदनी किराणा दुकानाजवळ राहणार्या शबाना समद खाटीक (25) या महिलेच्या बहिणीच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करुन समद इमरात खाटीक, शकीलाबी समद खाटीक, करीम समद खाटीक, शाहिरताबी हुसेन खाटीक सर्व रा. आझादनगर छोटी नावकी, धुळे या चौघांनी तिला शिवीगाळ, मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी देत 15 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 5 हजार रुपयांची रोकड असा 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेला. याप्रकरणी शबाना खाटीक यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील चौघांविरूध्द भादंवि कलम 392, 452, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला