विवाहितेचा छळ; चौघांविरुध्द गुन्हा

0

भुसावळ। मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी व रांजणगाव येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुध्द मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुकळी येथील दीपाली उमेश सांगळकर (22) या विवाहितेचा पती उमेश विश्‍वनाथ सांगळकर, सासू शोभाबाई विश्‍वनाथ सांगळकर, जेठ सचिन विश्‍वनाथ सांगळकर, नणंद दीपाली विश्‍वनाथ सांगळकर (रांजणगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) यांनी चारित्र्याच्या संशयावरुन तसेच लग्नात हुंडा कमी दिल्याने छळ केला. तपास एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहे.