बोदवड : व्यवसाय करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये न आाणल्याने वराड येथील विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेने तक्रार दिल्यावरून पतीसह पाच जणांविरोधात बोदवड पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार विवाहिता रेखा सुनील गोपाळ (22) यांनी माहेरून एक लाख रुपये न आणल्याने पती सुनील शंकर गोपाळ, सासरे शंकर गायभू गोपाळ, सासू सुगराबाई शंकर गोपाळ, दीर अनिल शंकर गोपाळ, नणंद मंगलाबाई दामू महाजन 28 फेब्रुवारी 2017 ते आजपावेतो शारीरीक व मानसिक छळ केला. छळ असहय्य झाल्याने रेखा गोपाळ यांनी फिर्याद दिल्यावरून पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्या आला. तपास हवालदार कालिचरण बिर्हाडे करीत आहेत.