विवाहितेचा छळ, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी कल्याण पतीसह सहा जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण येथील सासर व शहरातील अष्टविनायक कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहिता प्रतिभा अमितत पाटील या विवाहितेच्या तक्रारीनुसार शहर पोलिस ठाण्यात पती अमित रमेश पाटील, सासरे रमेश तुकाराम पाटील, सासू संध्या पाटील, अभिजीत पाटील (सर्व रा. कल्याण) व मध्यस्थी करणारे धनराज राजाराम पाटील व दीपाली पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेचा विवाह 31 डिसेंबर 2018 रोजी झाल्यानंतर विवाहिता माहेरी मामांसोबत येत असतांना रमेश पाटील (सासरे) यांनी नांदायला यायचे असल्यास माहेरून पाच लाख रुपये आणायचे सांगत पैसे न आणल्यास तिकडेच रहा, असे सांगत शिवीगाळ केली. महिला दक्षता समितीकडे अर्ज केल्यावरही सासरचे लोक नेण्यास तयार नसल्याचे जाणविल्याने अखेर विवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली. मध्यस्थी करणार्‍यांनी सासरच्यांनी केली मागणी पूर्ण करण्याचे सांगितल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.